जळगावात मध्यरात्री थरार.... माजी महापौरांच्या मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 01:19 IST2020-11-05T01:19:14+5:302020-11-05T01:19:38+5:30
पूर्ववैमनस्यातून व खुन्नस देण्याच्या कारणावरून घटना

जळगावात मध्यरात्री थरार.... माजी महापौरांच्या मुलाचा खून
जळगाव : माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८, रा. शिवाजी नगर) याचा रात्री १२ वाजता शिवाजी नगरातील उस्मानिया पार्क येथे खून झाला. घटनेची कारण अजून समोर आलेले नाही. जखमी अवस्थेत त्याला ओम क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गणेश व भुऱ्या नावाच्या तरुणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने हा खून केल्याचे सागंण्यात येत आहे. पूर्ववैमनस्यातून व खुन्नस देण्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली.