४ जुलैपासून सुरू होणारी एमएचटी-सीईटीची परीक्षा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 19:35 IST2020-07-02T19:35:43+5:302020-07-02T19:35:54+5:30
जळगाव - शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत ४ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२० ...

४ जुलैपासून सुरू होणारी एमएचटी-सीईटीची परीक्षा स्थगित
जळगाव- शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत ४ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२० ही परिक्षा महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वास्थ रक्षणाच्या दृष्टीकोनातून सदर परिक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल. असे एमएचटी-सीईटीचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.