लोहारा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:24+5:302021-07-28T04:16:24+5:30

रवींद्र संभाजी पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील कामगारांची स्थिती मांडली. सेवाज्येष्ठत्ता यादीत काही कर्मचारी दैनंदिन कामे सांभाळत ...

Meeting of Gram Panchayat employees at Lohara | लोहारा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा

लोहारा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा

रवींद्र संभाजी पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील कामगारांची स्थिती मांडली. सेवाज्येष्ठत्ता यादीत काही कर्मचारी दैनंदिन कामे सांभाळत वेगवेगळ्या पदव्या पदविका आदी कशा मिळवतात, याचे आश्चर्य व्यक्त करून सरकारने वेतन हिस्सा दिल्यावर पंचायती पगार हिस्सा व राहणीमान भत्ता देत नाही म्हणून तालुक्यातील महासंघ मजबूत करा, आवाहन केले.

अमृत महाजन म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे यांना नवीन किमान वेतनाचे अंमलबजावणीचे परिपत्रक काढून मोठा कायदेशीर दिलासा दिला आहे. त्याचा वापर आपणास किमान वेतन लढाईस कायदेशीर बळ मिळाले आहे.

मेळाव्यात महासंघ शाखा गठित करण्यात आली. कार्यकारिणी अशी-अध्यक्ष राजेंद्र होना खरे कासमपुरा, उपाध्यक्ष कैलास चौधरी लोहटार, सचिव रवींद्र संभाजी पाटील, लोहारा, खजिनदार सुभाष रामराव बाविस्कर, सहसचिव नीलेश पाटील कोल्हे, संघटक चंद्रकांत शेळके म्हसास, सदस्य गोरख जाधव पिंपरी कसबा, रमेश सोनवणे बिल्दी, राजेंद्र कोळी साजगाव, नीलेश गोपाळ, सुकलाल भोई पिंपळगाव, चंद्रकांत पाटील डोकलखेडा.

राजेंद्र खरे यांनी प्रास्तविक केले. सुभाष बाविस्कर यांनी आभार मानले. यावेळी पिंपरी, लोहटार, म्हसास, कोल्हे, माहिजी, डोकलखेडा, लोहारा या गावातील २५ कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Meeting of Gram Panchayat employees at Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.