ग्रामसेवकांकडील दाखल्यांची वैद्यकीय पडताळणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:16+5:302021-07-14T04:20:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रावेर : तालुक्यातील आठ ग्रामसेवकांनी खोटे अपंगत्वाचे दाखले काढून शासनाची दिशाभूल करून स्थानिक पातळीवरील बदल्यांकरिता ...

ग्रामसेवकांकडील दाखल्यांची वैद्यकीय पडताळणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : तालुक्यातील आठ ग्रामसेवकांनी खोटे अपंगत्वाचे दाखले काढून शासनाची दिशाभूल करून स्थानिक पातळीवरील बदल्यांकरिता लाभ घेतल्याचा आरोप करीत एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार केल्याने संबंधित ग्रामसेवकांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित ग्रामसेवकांच्या अपंगत्वाच्या दाखल्यांची पडताळणी करण्यात यावी, असे निवेदन भाजपच्या दिव्यांग आघाडी व तालुका दिव्यांग आघाडीने दिले आहे.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना हे निवेदन देण्यात आले.
संबंधित ग्रामसेवकांना पाठीशी घालूू नये; अन्यथा संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे. निवेदनावर भाजप दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष रजनीकांत बारी, सचिव संदीप पाटील, श्री दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष संजय बुवा, उपाध्यक्ष घनश्याम हरणकर, कार्याध्यक्ष विशाल कासार, तालुकाध्यक्ष ईश्वर महाजन, उपाध्यक्ष महेश महाजन, संजय माळी, मूकबधिर अध्यक्ष नीलेश पाटील, संदीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संबंधित ग्रामसेवकांचे अपंगत्वाचे दाखले हे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आधिपत्याखालील त्रिसदस्यीय समितीने अधिकृतपणे ऑनलाइन पदद्धतीने पारित केले आहेत. त्यास धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपंगत्व बोर्डाकची वैधता प्राप्त आहे. मात्र, आकसाने वा खोट्या तक्रारी दाखल करून दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडवून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तत्संबंधी गटविकास अधिकारी कार्यालयाकडे खुलासा सादर करणार आहोत.
-अरविंद कोलते, ग्रामविकास अधिकारी, विवरे बु. ग्रा.पं, विवरे बु., ता. रावेर