मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी करणार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:00+5:302020-12-04T04:45:00+5:30

याविषयी एक निवेदन देखील मंत्री ठाकूर यांना देण्यात आले. नितीन विसपुते यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांमध्ये फेविकॉल, व्हाईटनर, बाम ...

Measures to stop addiction in children | मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी करणार उपाय

मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी करणार उपाय

याविषयी एक निवेदन देखील मंत्री ठाकूर यांना देण्यात आले. नितीन विसपुते यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांमध्ये फेविकॉल, व्हाईटनर, बाम आदी घटक वस्तूंची नशा करण्याचे प्रमाण मोठे आहे. जळगावात या गंभीर विषयी चेतना व्यसनमुक्ती केंद्र काम करीत असून लहान मुले भविष्यात मोठ्या नशेकडे वळतात अशीही भीती निर्माण झाली आहे. व्यसन कुठलेही असो ते वाईटच, त्यामुळे कोवळी मुले नशेच्या जाळ्यात येऊ नये म्हणून प्रभावी उपाययोजना आखाव्यात, जळगावातून चेतना व्यसनमुक्ती शासनाला मदत करायला तयार आहे, असे सांगितले.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी, याबाबतची भीषणता ऐकल्यावर चिंता व्यक्त केली. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी वैजयंती तळेले, अँड. प्रदीप पाटील, डॉ. शैलजा चव्हाण, प्रतिक सोनार, प्रा. संजय पाटील, साजिद खान, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Measures to stop addiction in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.