अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 22:30 IST2019-12-12T22:30:09+5:302019-12-12T22:30:45+5:30
वादळी वाऱ्यासह गारपीट : रब्बी पिकांचे नुकसान, गुरांचा उरलासुरला चाराही भिजला, रस्त्यावर झाडे कोसळली

अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले
जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी ठिकठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र पुन्हा दुखावणारा अवकाळी पाऊस जोरदार वारा व गारपीट घेऊन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसाने हिरावला. त्यात रब्बी पिकांना नुकसानकारक ठरणाºया पावसाने सुरुवात केल्याने पिकांचे नुकसान होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
जिल्हाभरात शेतकºयांनी पिकांची पेरणी केली आहे. पपई, लिंबू आदी फळ पिके देखील काढणीवर आलेली आहेत. या पिकांना अवकाळीचा सवार्धिक फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. पाचोरा, भडगावसह पारोळा व एरंडोल तालुक्यात जोरदार पाऊस, वाजदळी वारा व गारपिटीचे प्रमाण जास्त होते.
याशिवाय काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला आहे. तर कुठे सायंकाळी सात वाजेनंतर पावसाला सुरूवात झाली होती.
कुºहाडसह परिसरात पावसासह गारपीट
कुºहाड, ता.पाचोरा : गुरुवारी दुपारी साडे चारच्या सुमारास कुºहाडसह सांगवी, साजगाव, नाईकनगर व लाख परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. लाख शिवारात पावसासह पाच मिनिटे गारपीट झाली. या परिसरात बोराच्या आकारासारखी गार शिवारातील शेतक?्यांनी पाहिली.यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच यावर्षीच्या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी कसातरी सावरत आजच्या या अवकाळी तडाख्यामुळे पुन्हा हतबल झाला आहे. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला
1 कुºहाड खुर्द येथील शेतकरी ईश्वर हिराचंद तेली यांच्या सारवे शिवारातील एक एकरावरील काढणीवर आलेल्या पपई बागेचे अर्धा तास चाललेल्या वादळी वाºयासह अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यामुळे सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
2 कुºहाड ते पाचोरा या रोडवर साजगावजवळ चिंचेचे मोठे झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती. तसेच वाºयाचा जोर जास्त असल्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याचे समजते. परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
3 कुºहाड येथून जवळच असलेल्या लाख शिवारातील दादरचे पीक चांगले आले होते. मात्र वादळी वारा, गारपीट व पावसामुळे ते जमीनदोस्त झाले आहे. परिसरात सायंकाळी सातनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
4 हडसन, ता.पाचोरा येथे १० मिनिटे वादळी वारा व गारपीट झाली. वरखेडीसह परिसरात वीज प्रवाह खंडीत झाला होता. काही काळानंतर तो पुन्हा सुरळीत झाला. भातखंडे बुद्रूक येथे २० मिनिटे जोरदार पाऊस झाला.
आमडदे, ता.भडगाव येथे दहा मिनिटे जोरदार हजेरी लावली.
पारोळा : पारोळा व एरंडोल तालुक्यातील काही भागात गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने तब्बल अर्धा तास अक्षरश: झोडपून काढले. काही भागात गारांचा पाऊस झाला. या पावसाने शेतकरी वर्ग अधिकच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
पारोळा तालुक्यात भोंडण, चोरवड, बहादरपूर, उंदिरखेडा यासह परिसरात अवकाळी पावसाने दुपारी ४ वाजता अर्धा तास पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गुरांचा चारा ओला झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या मका, ज्वारी या धान्याचे नुकसान झाले भोंडण. येथे बारीक गार पडल्याचे समजते. चोरवड येथे दत्तजयंतीनिमित्त यात्रेतील दुकानदारांसह यात्रेकरूंची अचानक धांदल उडाली.
उत्राण, ता़ एरंडोल : परिसरात ३ वाजून ५५ वाजेच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. पावसाने अक्षरश : थैमान घालून शेतमजुरांना झोडपून काढले. सुमारे २० मिनिटे मुसळधार पाऊस झाला तर १८ अठरा मिनिटे जबरदस्त गारपीट झाली़ यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्ताविण्यात येत आहे़ झाडांच्या फांद्या व काही ठिकाणी घराचे पत्रे उडल्याचे समजते़ या वादळी पाऊस व गारपीटीमुळे लिंबू व पेरू आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे येथील शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचांलक आनंदा धनगर यांनी सांगितले़ हरबरा, दादर, मका, गहू आदी पीकांची पेरणी होऊन पिके चांगली शेतात तरारली होती़ फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे बोलले जात आहे़