खासदार भाचीसाठी मामा करणार मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:32 IST2018-08-10T12:32:00+5:302018-08-10T12:32:14+5:30

Maternal uncle intervenes for MP Bhasi | खासदार भाचीसाठी मामा करणार मध्यस्थी

खासदार भाचीसाठी मामा करणार मध्यस्थी

जळगाव : नंदुरबारच्या भाजपाच्या खासदार डॉ. हीना गावीत व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांच्यातील वादावर डॉ. हीना यांचे मामा आणि चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी हे मधस्थी करणार आहेत.
चोपडा (जि.जळगाव) येथे मराठा आरक्षण मोर्चाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी वळवी यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. डॉ.हीना गावित यांच्या फियार्दीवरुन धुळे येथील मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले अ‍ॅट्रॉसीटीसारखे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच या घटनेवर लवकरच पडदा टाकण्यासाठी आपण स्वत: नंदुरबार व धुळे येथे भेट देऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन वळवी यांनी मराठा मोर्चेकºयांना दिले.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , चोपडा येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Maternal uncle intervenes for MP Bhasi