शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बालिकेच्या हत्येप्रकरणी प्रचंड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:42 IST

समतानगरातील घटना

ठळक मुद्देदोषींवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयावरही धडक

जळगाव : समतानगरातील बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अमानवी अत्याचार करून खून केल्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शुक्रवार १५ रोजी सर्वपक्षीय नागरिकांच्या मोर्चाद्वारे करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनही सादर केले. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले.शिवतीर्थ मैदानावरून सकाळी ११.४५ च्या सुमारास या मूकमोर्चास प्रारंभ झाला. त्यात आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, शिवचरण ढंढोरे, माजी उपमहापौर करीम सालार, अरूण चांगरे, भाजपा गटनेता सुनील माळी, खाविआचे सदस्य राजेश शिरसाठ, नगरसेवक राजू मोरे, मुफ्ती हारून नदवी, नगरसेविका कंचन सनकत, मंगला बारी, भाजपा उपाध्यक्ष वैशाली पाटील, जयप्रकाश चांगरे, वसंतराव चांगरे, दिलीप चांगरे, चेतन सनकत, आरपीआय युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, राष्टÑवादी प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, राष्टÑवादी महानगराध्यक्ष निता चौधरी, राष्टÑवादी प्रदेश सचिव लता मोरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मेहतर वाल्मिकी समाज पंचायतचे सदस्य व समाजबांधव सहभागी झाले होते.पोलीस अधीक्षकांशी चर्चामूकमोर्चा प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात मयत बालिकेच्या वडिलांनी मागणी केली की, ते स्वत: शिक्षा भोगत असताना त्यांच्या मुलीच्या खुनामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे मुलीला न्याय मिळवून द्यावा. पोलीस अधीक्षकांनी शासनाकडून मदत मिळवून देण्याची व मयत बालिकेस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. समता नगरात नियमित पोलीस गस्त राहील. या आठवड्यात डीवायएसपी सचिन सांगळे समतानगरातील रहिवाशांशी समस्यांबाबत चर्चा करून म्हणणे ऐकून घेतील, असे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडकपोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कराजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देऊन मयत बालिका ही मेहतर वाल्मिकी समाजाची असल्याने तिच्या कुटुंबास शासनाकडून संरक्षण व आर्थिक मदत मिळवून द्यावी. या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुती करावी. हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. तसेच मयत बालिकेचे वडिल जन्मठेपेची शिक्षा भोगत असून १० दिवसांसाठी पे-रोलवर आहेत. त्यांची दीड वर्षांची राहिलेली शिक्षा रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव