सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 06:42 IST2019-04-05T06:41:52+5:302019-04-05T06:42:19+5:30

पोलिसांच्या डोक्याला ताप

To marry Salman, the Prime Minister of the school | सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे

सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे

जळगाव : बातमी वाचून आश्चर्य वाटेल, पण सत्य आहे. जळगावच्या एका ३५ वर्षीय शिक्षिकेने चक्क सिने अभिनेता सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही शिक्षिका सलमान खानच्या प्रेमात बुडाली असून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिले आहे. त्याशिवाय पोलिसांनाही १२ पानांचे पत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन गुरुवारी शिक्षिकेचा अर्ज निकाली काढण्यात आला.

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही शिक्षिका राहते. पंतप्रधान मोदी व पोलिसांना दिलेल्या पत्रात तिने म्हटले आहे की, मला आई, वडील कोणीच नाही. जीवनसाथी हवा आहे, पण तो सलमान खानच. त्याच्याशी मी आनंदाने संसार करेन. मलाही वाटतं की आपले लग्न व्हावे, संसार व्हावा, जोडीदार असावा. तशीच इच्छा सलमान खानची पण आहे. त्यामुळे मला सलमानशीच लग्न करायचे आहे. त्याशिवाय १२ पानांच्या स्वतंत्र अर्जातही संसार व राजकारण, समाजकारणावर यावर तिने भाष्य केले आहे.

पोलिसांच्या डोक्याला ताप
या शिक्षिकेने पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक ठिकाणी अर्ज केले आहेत. त्याची चौकशी होऊन सर्व अर्ज एमआयडीसी पोलीस स्टेशनला आले आहेत. शिक्षिकेच्या या विचित्र मागणीवर करायचे तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. १२ डिसेंबर २०१८ रोजी तिने हे अर्ज व पत्रे दिलेली आहेत. गुरुवारी हे अर्ज निकाली काढल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: To marry Salman, the Prime Minister of the school