कौटुंबीक वादातून डिझेल टाकून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST2021-08-12T04:21:58+5:302021-08-12T04:21:58+5:30
जळगाव : काैटुंबीक वादातून रेखा रमेश राठोड (वय ३५,रा.मोहाडी, ता.जळगाव) या विवाहितेने राहत्या घरीच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची ...

कौटुंबीक वादातून डिझेल टाकून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले
जळगाव : काैटुंबीक वादातून रेखा रमेश राठोड (वय ३५,रा.मोहाडी, ता.जळगाव) या विवाहितेने राहत्या घरीच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. रेखा आत्महत्या करु शकत नाही, तिला सासरच्यांनी जाळून मारल्याचा आरोप आई, वडिलांनी केला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील माहेर असलेल्या रेखा हिचे ११ वर्षापूर्वी मोहाडी, ता.जळगाव येथील रमेश राठोड याच्याशी विवाह झाला होता. दोघांना विद्या व प्रशांत ही दोन मुले आहेत. काही महिन्यापासून दोघांमध्ये वारंवार वादाची ठिणगी पडत गेली. मंगळवारी दुपारी दोन वाजता वडील धनराज चव्हाण यांना सुभाषवाडीत असताना मुलीने जाळून घेतल्याचा फोन आला. त्यांनी लागलीच पत्नी विमलबाई यांना सोबत घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले. ७० टक्के जळाल्याने रेखाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिला शवविच्छेदनगृहात नेण्यात आले होते. तेथे मुलाची मृतदेह पाहताच आईने प्रचंड आक्रोश केला.