कार उलटल्याने दाम्पत्य जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:49 IST2019-05-27T15:48:53+5:302019-05-27T15:49:32+5:30
मेहूटेहू गावाजवळील घटना : वाहनाने मारला कट

कार उलटल्याने दाम्पत्य जखमी
पारोळा : चाळीसगाव रस्त्यावरील मेहूटेहू गावाजवळ वाहनाने कट मारल्याने कार उलटून झालेल्या अपघातात चाळीसगाव येथील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना २६ रोजी दुपारी ४ वाजता झाली. जखमींना तत्काळ उपचारासाठी जळगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
पारोळा चाळीसगाव रोडवर मेहूटेहू गावाच्या पुढे चाळीसगाव येथील दाम्पत्य हे २६ रोजी दुपारी ४ वाजता पारोळा कडुन चाळीसगाव कडे आपली कार क्र एम एच १९ सी एफ १२४० ने जात होते. या दरम्यान त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या वाहनाने कट मारल्याने त्यांची कार रस्त्याच्या खाली उलटली. या अपघातात कारमधील शरद खेडकर (५२) व त्यांची पत्नी रत्नाबाई खेडकर हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तसेच येणाºया जाणाºया वाहनधारकांनी मदतकार्य राबविले. जखमी दाम्पत्याला तात्काळ उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे व डॉ.सुनील पारोचे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत अपघाताची नोंद नव्हती.