शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दिलेल्या उघडीपीच्या वेळेत बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:32 IST

दिवाळीच्या खरेदीला आला अडथळा : ग्राहकांची गैरसोय, विक्रेत्यांची झाली फजिती

भुसावळ : सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाहिजे तशी लगबग रेलचेल दिसली नाही. परंतु पावसाने थोडी उघडीप देताच लक्ष्मीपूजनासाठी लागणारी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात गर्दी उसळली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार तर काही वेळ मुसळधार अशा पावसामुळे नागरिकांची आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारच्या वेळेस पावसाने थोडीशी उसंत दिल्याने नागरिकांनी लगबगीने दिवाळीची खरेदी केली. येथील आठवडे बाजारात दिवाळी सणानिमित्त दोन पैसे खिशात जातील या आसेपोटी ग्रामीण भागातील अनेक विक्रेते तसेच व्यवसायिकांनी अगदी रस्त्यावर दुकाने थाटली होती. परंतु पावसामुळे बराच वेळ ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी बाजारपेठेत उठाव कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गतवर्षी अवर्षणाच्या स्थितीचे बाजारपेठेवर सावट होते. यंदा मात्र पावसाचे सावट असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर भर देत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र दिवसभरात जेव्हा जेव्हा पावसाचा वेग मंदावला तसेच पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली त्यावेळेची संधी साधत अनेकांनी बाजारपेठ गाठली. यातच मध्येच पाऊस आल्यास ग्राहकांना दुकानांच्या आडोशाचा आधार घ्यावा लागला.तर किरकोळ विक्रेत्यांना आपला माल प्लॅस्टीकच्या कापडाने झाकण्याची कसरत वारंवार करावी लागली.आॅनलाइन खरेदीचा परिणामदीपोत्सवा साठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी युवकांसह जवळपास सर्वच नागरिक आॅनलाइनचा आधार घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. धावपळीच्या युगात प्रत्येक जण कामात व्यस्त असताना अशा परिस्थितीत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र सर्वच जण वेळ काढून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतच दाखल होत असतात. दरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट देण्यात येत आहे.अंगणी पाणीच पाणी, रांगोळी काढावी कशी ?पावसामुळे शहरासह परिसरातील रस्ते चिखलमय झाले असून या पावसामुळे घराघरात साथीच्या आजाराचे रुग्ण दिसून येत असून त्यामुळेही दिवाळीचा उत्साह काहीसा कमी झाला असून घराबाहेर चिखलमय परिस्थिती असल्यामुळे नेमकी रांगोळी काढावी तरी कशी ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे मात्र महिलांच्या उत्सवावार पाणी फिरले आहे. भर दिवाळीत रांगोळी विना अंगण पाहताना गृहिणींना खटकणारे ठरत आहे. बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहे. याला अपवाद फक्त जी मोठी घरे आहेत व त्याघरांना पोर्च आहे, अशा ठिकाणी फक्त रांगोळी काढलेली दिसून आली.