शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मार जिवाशी!

By admin | Updated: March 15, 2017 00:01 IST

धुळ्यात डॉक्टरला बेदम मारहाण अटकेतील आरोपीची कोठडीत आत्महत्या

धुळे : जखमी रुग्ण हालचाल करीत असल्याने सीटीस्कॅन करताना अडथळे येत आहे, असे सांगितल्याचा राग आल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी रविवारी रात्री शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रोहन एकनाथ मामुनकर या डॉक्टरला जबर मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेप्रकरणी   अटक  केलेल्या ९  पैकी प्रदीप सदाशिव वेताळ या २३ वर्षीय संशयित युवकाने मंगळवारी दुपारी शहर पोलीस स्टेशनच्या शौचालयात चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्करबर्डी शिवारात १२ मार्च रोजी चैत्राम उर्फ शत्रू शिवाजी लष्कर (२१) (रा़ चक्करबर्डी) या तरुणाची मोटारसायकल घसरून  त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता़ त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात  दाखल केले़  अपघात विभागात त्याला स्थलांतरित केल्यानंतर त्याचे सिटीस्कॅन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला़ दरम्यान,  सिटीस्कॅन करताना रुग्ण डोके हलवित असल्याने  अडथळे येत असल्याचे डॉ. रोहन  मामुनकर यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त नातेवाइकानी डॉक्टरांना  मारहाण करून  साहित्याची  तोडफोड  केली़ जखमी डॉक्टरला मुंबईला हलविले डॉ. रोहन  मामुनकर यांच्या  डोळ्याला गंभीर दुखापत  झाली. त्यांना तातडीने मुंबईतील  खासगी रुग्णालयात हलविले.शिरपुरातही मोडतोडशिरपूरमध्ये डॉ. बी. टी. अग्रवाल हॉस्पिटलमध्ये रक्तस्त्राव झाल्याने दीपाली उदय ढोले (वय २८, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) हिच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. अटकसत्र आणि कोठडीत आत्महत्यावैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ़ अरुणकुमार रमेश नागे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी डॉ.मामुनकर यांना मारहाण करणाºया विरोधात भादंवि कलम ३५३, ३०७, १४३, १४७, १४९, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ कलमान्वये जमावाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.नऊ आरोपी अटकेत विनोद बापू तागळकर (२२), चंद्रकांत किसन लष्कर (३२), अजय विजय लष्कर (१९), एकनाथ शंकर कुसळकर (२३), लखन सीताराम लष्कर (२३), अंबादास मनोहर कुसळकर (२८), सुनील रामकिसन कुसळकर (३०), छोटू बापू विठेकर (२६), प्रदीप सदाशिव वेताळ (२३) अटकेत.तपास सीआयडीकडेन्यायालयाने आरोपींना  १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुपारी साडेतीन वाजता प्रदीप सदाशिव वेताळ (वय २३) याने लॉकअपमधील शौचालयात चादरीने गळफास घेतला.आत्महत्येचे वृत्त कळाल्यानंतर चक्करबर्डी परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन गाठले.डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.पोलीस अधीक्षक  एस. चैतन्या यांनी कोठडीत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रदीपचा मृतदेह ताब्यात घेतला. जखमीचा मृत्यूजखमी चैत्राम लष्कर याचा  १३ मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.