मंगरुळला दोनदा आग लागून २५ हजाराचा चारा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:56 IST2020-12-24T17:55:45+5:302020-12-24T17:56:34+5:30

मंगरूळ येथे कडब्याला आग लागून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ६ ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे.

Mangrul caught fire twice and destroyed 25,000 fodder | मंगरुळला दोनदा आग लागून २५ हजाराचा चारा खाक

मंगरुळला दोनदा आग लागून २५ हजाराचा चारा खाक

ठळक मुद्देनगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग विझवली

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे कडब्याला आग लागून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ६ ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी आग लागल्याने अग्निशामक बंब बोलावण्यात आले होते. 

सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुरलीधर दंगल पाटील यांच्या धुळे रोडवरील खळ्यातील चाऱ्याला अचानक आग लागली. ग्रामस्थांची धावपळ उडाली. ग्रामस्थ आणि नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे नितीन खैरनार, जाफर खान, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली, तोपर्यंत सुमारे २५ हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला होता. उर्वरित चाऱ्यात उष्णता धगधगत होती. दुपारी २ वाजेनंतर पुन्हा आग लागल्याने पुन्हा अमळनेरहून अग्निशामक बंब मागवण्यात आला होता. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र कोणीतरी दोनजण आग लावून पळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: Mangrul caught fire twice and destroyed 25,000 fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.