पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:20+5:302021-07-14T04:19:20+5:30
जळगाव : चिठ्ठी दाखवून पत्ता विचारण्याचा बहाणा करुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी माया दीपक निकम (वय ४२) या महिलेच्या गळ्यातील ...

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबविले
जळगाव : चिठ्ठी दाखवून पत्ता विचारण्याचा बहाणा करुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी माया दीपक निकम (वय ४२) या महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅमचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी पिंप्राळा येथील शिवराणा नगरात दत्त मंदिराजवळ घडली. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माया निकम या दत्त मंदिराजवळील योगेश मंत्री यांच्या घराजवळ असताना विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन दोन जण आले. निकम यांना चिठ्ठी दाखवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि काही कळण्याच्या आतच गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार झाले. निकम यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत संशयित पसार झाले होते. दुचाकीची नंबर प्लेट झाकलेली होती. एक जण उंच व धिप्पाड व गोऱ्या रंगाचा होता. दुसरा बारीक दाढी व मास्क लावलेला होता. या घटनेनंतर माया निकम यांनी रामानंद नगर गाठून पोलिसांना माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी या भागात शोध मोहीम व सीसीटीव्ही तपासणी केली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी तपास करीत आहेत.