रोलबॉल राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मानसी पाटीलचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:31 IST2019-01-04T22:30:31+5:302019-01-04T22:31:34+5:30

रोलबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळविणाºया मांदुर्णे येथील मानसी विनायक पाटील हिचा गुरुवारी बालिका दिनाच्या पर्वावर जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Manasi Patil felicitated for getting gold medal in Rollball National Games | रोलबॉल राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मानसी पाटीलचा सत्कार

रोलबॉल राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मानसी पाटीलचा सत्कार

ठळक मुद्देचाळीसगाव येथे सत्कारकार्यक्रमास पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती

चाळीसगाव, जि.जळगाव : रोलबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळविणाºया मांदुर्णे येथील मानसी विनायक पाटील हिचा गुरुवारी बालिका दिनाच्या पर्वावर जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रमही साजरा झाला.
या वेळी वसंत नारायण पाटील, विनायक पाटील, राजाराम पाटील, दिलीप बाविस्कर, जि.प.सदस्य भूषण पाटील, सर्वोदय शिक्षण मंडळाचे संचालक सुरेश पाटील, अर्जुन पाटील, पंचाय समितीचे माजी सदस्य प्रकाश बाविस्कर , दिलीप शिरूडे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील व संचालक मंडळ, गावातील आजी व माजी सरपंच व सदस्य तसेच गावकरी मंडळी हजर होते.
सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी, तर मुख्याध्यापक आर.के.माळी यांनी आभार मानले.

Web Title: Manasi Patil felicitated for getting gold medal in Rollball National Games