शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पानभर सुसाईड नोट लिहून व्यवस्थापक तरूणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:27 IST

जळगाव : पानभर सुसाईड नोट लिहून इलेक्ट्रीक स्कुटर शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला असलेल्या प्रियंका मदन दास (२७, रा. कवाळेनगर, ...

जळगाव : पानभर सुसाईड नोट लिहून इलेक्ट्रीक स्कुटर शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला असलेल्या प्रियंका मदन दास (२७, रा. कवाळेनगर, भुसावळ, ह.मु.सिभागवाडी, रिंगरोड) या तरूणीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.

भुसावळ येथील रहिवासी प्रियंका दास ही शहरातील रिंगरोड परिसरातील एका इलेक्ट्रिक स्कुटर शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होती. दोन वर्षांपासून ती याठिकाणी नोकरी करीत असल्यामुळे तिने जिल्हा बँकेच्या मागील बाजूस राहण्यासाठी भाडेतत्वावर खोली घेतली होती. ती त्याच ठिकाणी एकटी वास्तव्यास असायची. दरम्यान, सोमवारी सायंकाळ होवून सुध्दा प्रियंका ही कामावर आली नाही, म्हणून शोरूममधील कामगार विजय गोकुळे परदेशी हा तिच्या घरी गेला. त्याला दरवाजा आतून बंद दिसून आला. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रियंका हिने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

जीवनाचा कंटाळा आलाय...

प्रियंका हिने आत्महत्या केल्याचे दिसताच, लागलीच विजय परदेशी याने जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे, प्रदीप चांदेलकर, पोलीस कर्मचारी करूणासागर जाधव आदींनी काही क्षणात घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना मृतदेहाजवळ पानभर लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. जीवनात अनेक धक्के बसताहेत, आता कंटाळा आलाय यासह इतर बाबींचा उल्लेख त्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सायंकाळीच मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला़ मंगळवारी शवविच्छेदन होवून मृतदेह कुटूंबियांचे ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास प्रदीप चांदेलकर करीत आहे.