शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चुंचाळे फाट्याजवळील अपघातात जळगावचा एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 01:58 IST

मुकेश सोनार व रमेश सोनार हे दोघे जण एमएच-१९-सीक्यू-२९९० क्रमांकाच्या मोटारसायकलने यावलकडे येत होते. याच दरम्यान यावलहून किनगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच-१९-४१०० क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीलाजोरदार धडक दिली.

यावल (जि. जळगाव) : तालुक्यात यावल-चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ झालेल्या अपघातातजळगाव येथील मयूर कॉलनीतील मुकेश लोटन सोनार (वय ४९) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले रमेश बळीराम सोनार (वय ३६, रा.रेणुकानगर, मेहरुण, जळगाव) हे जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी दहाला हा अपघात झाला.सूत्रांनुसार, मुकेश सोनार व रमेश सोनार हे दोघे जण एमएच-१९-सीक्यू-२९९० क्रमांकाच्या मोटारसायकलने यावलकडे येत होते. याच दरम्यान यावलहून किनगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच-१९-४१०० क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीलाजोरदार धडक दिली. त्यात मुकेश सोनार हे जागीच ठार झाले, तर सोबत असलेले मुकेश सोनार हे जखमी झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काहींनी तातडीने मदतीसाठी धावपळ सुरू केली. दोघांना प्रारंभी जळगाव येथे हलविण्यात आले.रमेश यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामादेखील करण्यात आला.ट्रक चालकाविरूद्ध गुन्हाट्रकचालक शेख सलीम अब्दुल्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. घटनास्थळी यावल येथील सोनार समाजाचे अध्यक्ष नितीन सोनार यांची तातडीची मदतीसाठी धावून आले होते. घटनेचे वृत्त जळगाव येथे कळताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला . मयुर कॉलनीतील मयताच्या घराजवळ एकच गर्दी झाली होती. नातेवाईकांची समजूत काही जण घालत होते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव