Maize, cotton lying in the house | मका, कापूस घरात पडून

मका, कापूस घरात पडून


जामनेर : शेतकऱ्यांच्या घरात कापूस व मका जमा झाला आहे. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजात्सव मातीमोल भावात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.
कोरड्या कापसाला ४ हजार ५०० व ओल्या कापसाला ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० भाव व्यापारी देत आहे. मका ९०० पासून तर ११०० रुपये या दराने खरेदी केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा परतीच्या पावसाने कापूस, मका व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादनातही घट आली. शासनाने हमीभाव जाहीर करून तातडीने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Maize, cotton lying in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.