खेडगाव ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:40 IST2021-02-13T18:40:31+5:302021-02-13T18:40:49+5:30
खेडगाव ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’ आले आहे.

खेडगाव ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’
खेडगाव, ता. भडगाव : येथील ग्रा.पं.मध्ये सरपंचपदी रूपाली गजानन गोकुळ व उपसरपंचपदी भारती भगवान हिरे या महिलांच्या निवडीबरोबर नऊपैकी पाच महिला ग्रा. पं. सदस्या झाल्याने पहिल्यांदाच महिलाराज आले आहे.
निवडीनंतर सरपंच रूपाली गोकुळ व उपसरपंच भारती हिरे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर भाऊसाहेब गांगुर्डे, सुनील अभिमन सोनवणे यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास पाटील, रघुवीर हिरे, भगवान गोकुळ, योगेश शीनकर, दत्तात्रय हिरे, श्रीकांत हिरे उपस्थित होते.
निवड शांततेत पार पडल्याने अधिकाऱ्यांनी गावाविषयी गौरवोद्गार काढले. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे शिक्षण, आरोग्य यात लक्ष घालण्याची ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.