महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 20:45 IST2021-04-24T20:45:30+5:302021-04-24T20:45:48+5:30

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शिंदे हे खासगी दवाखान्यात उपचारार्थ आठवडाभरापासून दाखल होते.

Maharashtra University Employees Federation President Ramesh Shinde dies due to corona | महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव : महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी (मुद्रितशोधक) रमेश डोंगर शिंदे (५४,रा.द्रौपदीनगर) यांचा शनिवारी सायंकाळी कोरोनाने मृत्यू झाला.

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शिंदे हे खासगी दवाखान्यात उपचारार्थ आठवडाभरापासून दाखल होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. अत्यंत धडाडीचे समजले जाणारे शिंदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी- अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते. विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी वृत्तपत्रात मुद्रितशोधक व उपसंपादक म्हणूनही काही वर्षे काम केले.

Web Title: Maharashtra University Employees Federation President Ramesh Shinde dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.