शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात १७० वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:44 IST

जखमी व मृत्यू झालेल्या प्राण्यांच्या नोंदी सापडेना

जळगाव : महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात १७० च्यावर वाघ आढळून येतात, अशी माहिती किशोर रिठे यांनी दिली.विद्यापीठात आयोजित व्याघ्रसंवर्धन कार्यशाळेत त्यांनी विविध उपायही सुचविले.अपघातात असंख्य वन्यप्राण्यांचा मृत्यूकाही वर्षापूवी मेळघाटकडून आलेल्या बाजीराव या वाघाचा नागपूर-अमरावती महामार्गावर वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला़ यासारखे असंख्य प्राण्यांचा दुभाजकावरील घनदाट झुडपांमुळे समोरील बाजू न दिसल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता़ त्यामुळे महामार्गांवर वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पाईप टाकले जातात़मात्र, पाच मीटर उंचीचे पाईन न टाकता कमी उंचीची टाकल्यामुळे वन्यप्राणी ही रस्त्यावरून संचार करतात त्यामुळे हा अपघात होता़ यासाठी सर्वांची विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्याची आवश्यकता आहे़ आज काही ठिकाणी कालवे बांधलेले दिसतील़ या कालव्यामुळे वाघ किंवा अन्य प्राण्यांना एकीकडून दुसरीकडे जाता येत नाही़ ज्या कालव्यामंध्ये काही अशांमध्ये वाघ पडून त्यांचा मृत्यू होतो़ त्यामुळे कालवा हा खुला नसावा, असे रिठे यांनी सांगून उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले़ यानंतर महाराष्ट्रात २३० तर मध्यप्रदेशात ४०० च्यावर वाघ आढळून येतात, अशी माहिती त्यांनी दिली़दरम्यान, अनेक जखमी व मृत्यू झालेल्या वाघांच्या नोंदी आपल्याकडे सापडत नाही ही खंत आहे़ इमारती, रस्ते तसेच रेल्वे रूळ बांधकामांच्या प्रस्तावांवर आज लक्ष ठेवण्याची गरज आहे़ जेणे करून त्यावर उपाय सुचविता येतील आणि वन्यप्राण्यांना अडथळे निर्माण होणार नाही़ त्यामुळे मानवी जीवनास कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले़यावेळी परिषदेला विद्यार्थ्यांसह वन्यजीव संरक्षण संस्था, आॅर्किड नेचर फाउंडेशन, सातपुडा फाउंडेशन, सातपुडा बचाव कृती समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती़सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे व अर्चना उजागरे यांनी केले तर आभार राहूल सोनवणे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी अभय उजागरे, राहूल सोनवणे, प्रसाद सोनवणे, एऩसी़वाघ, भूषण चौधरी, विजय रायपुरे, वासुदेव वाढे, सतिश कांबळे, संदीप झोपे आदींनी परिश्रम घेतले़यावल अभयारण्याचे सांगितले महत्वपॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनद्वारे किशोर रिठे यांनी व्याघ्र संवर्धनामध्ये यावल अभयारण्याचे महत्व सांगितले. त्यानंतर सातपुडा भुप्रदेश व व्याघ्र संवर्धनाचे महत्व, वन्यजीव संचार मार्ग, समुदायाच्या मालकीचे समुदायाद्वारे संचालित निसर्ग संवर्धन, डोलारखेडा व्याघ्र अधिवास आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले़ यानंतर पर्यावरण प्रशाळा विभागाचे प्रा़ डॉ़ एस़टी़इंगळे यांनी मार्गदर्शन केले़

टॅग्स :Jalgaonजळगाव