Maha Janadesh Yatra in jalgaon | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यात
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यात

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 23 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. जळगावसह भुसावळ व जामनेर अशा तीन ठिकाणी जाहीर सभा होत आहेतजळगावात दुपारी दीड वाजता जाहीर सभा होईल.

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 23 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. यात त्यांच्या जळगावसह भुसावळ व जामनेर अशा तीन ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. ही यात्रा 23 रोजी सकाळी 11.30 वाजता अमळनेर येथे व दुपारी 12.30 वाजता धरणगाव येथे पोहचेल. या दोन्ही ठिकाणी यात्रेचे स्वागत होईल. यानंतर ही यात्रा जळगाव येथे पोहचणार आहे. 

जळगावात दुपारी दीड वाजता जाहीर सभा होईल. दुपारी 3 वाजता भुसावळ येथे तर सायंकाळी 5 वाजता जामनेर येथे जाहीर सभा होईल. यानंतर ही यात्रा पुन्हा भुसावळात येईल आणि तिथे मुक्काम असेल. शनिवार 24 रोजी सकाळी 11 वाजता बोदवड येथे स्वागत होऊन यात्रा मलकापूरकडे रवाना होणार आहे.

Web Title: Maha Janadesh Yatra in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.