‘मधुकर’च्या कार्यकारी संचालकांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:01 IST2019-06-29T18:39:29+5:302019-06-29T19:01:54+5:30

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) तात्यासाहेब पंढरीनाथ निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Madhukar executive director resigns | ‘मधुकर’च्या कार्यकारी संचालकांचा राजीनामा

‘मधुकर’च्या कार्यकारी संचालकांचा राजीनामा

ठळक मुद्देसंचालक मंडळाच्या सभेत राजीनामा मंजूरवैयक्तिक कारणामुळे दिला राजीनामा

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) तात्यासाहेब पंढरीनाथ निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो शनिवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
कारखाना प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण करत असताना निकम यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये हंगाम सुरू होण्याआधी कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. हंगाम संपल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. हा राजीनामा शनिवारी चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती कारखाना सूत्रांनी दिली.

Web Title: Madhukar executive director resigns