एम.राजकुमार जळगावचे नवे पोलीस अधीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 22:54 IST2022-10-20T22:54:45+5:302022-10-20T22:54:58+5:30

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.

M. Rajkumar is the new Superintendent of Police of Jalgaon | एम.राजकुमार जळगावचे नवे पोलीस अधीक्षक

एम.राजकुमार जळगावचे नवे पोलीस अधीक्षक

जळगाव :

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत. एम.राजकुमार यांच्या नियुक्तीच्या आदेशाने लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
एम. राजकुमार सध्या नागपूर लोहमार्ग येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथे चार वर्ष एस.पी.म्हणून काम सांभाळले. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच जळगावच्या पोलीस अधीक्षक पदासाठी एम. राजकुमार यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. मुंढे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.

Web Title: M. Rajkumar is the new Superintendent of Police of Jalgaon