एम. एम. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:54+5:302021-07-30T04:17:54+5:30
पुणे येथील युनिक ॲकॅडमीचे प्रा. अजित चहाळ, प्रा. सुनील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण ...

एम. एम. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
पुणे येथील युनिक ॲकॅडमीचे प्रा. अजित चहाळ, प्रा. सुनील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी यांनी भूषविले, तर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे अध्यक्ष संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी केले.
या ऑनलाईन वेबिनारसाठी महाविद्यालयातील व महाविद्यालयाच्या बाहेरील सुमारे १०० विद्यार्थी व प्राध्यापक हजर होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. चंद्रकांत खराटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माणिक पाटील यांनी केले, तर आभार प्रा. स्वप्नील भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रा. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. राजेश वळवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. एस. आर. ठाकरे व युनिक ॲकॅडमीचे यांनी परिश्रम घेतले.