‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४१ वा वर्धापन दिन : वाचक व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:14 IST2018-12-15T12:14:02+5:302018-12-15T12:14:24+5:30

स्वागतासाठी सजले ‘लोकमत भवन’

'Lokmat' today, 41st anniversary of Jalgaon edition: Happy reading by readers and well wishers | ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४१ वा वर्धापन दिन : वाचक व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४१ वा वर्धापन दिन : वाचक व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव : वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचा ४१ वा वर्धापन दिन शनिवार, १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्त ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी ‘लोकमत भवन’मध्ये तयारी पूर्ण झाली आहे.
‘लोकमत’च्या एमआयडीसी कार्यालयात शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळात स्रेहसोहळा होणार आहे. वाचक, हितचिंतक व स्नेहीजनांनी आवर्जून सहभागी व्हावे, कृपया पुष्पगुच्छ व भेटवस्तू आण ूनये, असे आवाहन ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी केले आहे.
खान्देशशी ‘लोकमत’ची नाळ जुळूनही चार दशके लोटली. समाज जीवनात स्थित्यंतरे घडली. खान्देशी माणसाच्या मनातला ओलावा आणि ‘लोकमत’मधील खान्देशविषयीची आस्था, स्रेह वृध्दिंगत होत राहिला. ही सुखद आणि आश्वासक वाटचाल केवळ आपल्या सारख्या सुहृदांच्या स्रेह व पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे.
वर्धापनदिनानिमित्त ‘वसा आणि वारसा’ या विषयावर विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपात २५ मान्यवरांच्या कर्तृत्त्वाची माहिती दिली आहे.

Web Title: 'Lokmat' today, 41st anniversary of Jalgaon edition: Happy reading by readers and well wishers