‘लोकमत’ सीएनएक्स विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 20:16 IST2018-10-08T20:16:04+5:302018-10-08T20:16:48+5:30

‘लोकमत’ सीएनएक्स विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन
जळगाव : शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाबाबत ‘लोकमत’ सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे तसेच स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा, सीएनएक्सच्या उप व्यवस्थापक भावना शर्मा उपस्थित होते.