शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला, भरधाव कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 16:51 IST

Accident Case : हा थरार प्रवाशी आणि कामगारांनी अनुभवला. काही सेकंदाच्या या घटनमुळे या सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता.

आत्माराम गायकवाडखडकदेवळा  जि. जळगाव : भरधाव वेगाने जाणार्‍या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणार्‍या जेसीबीचा कट लागला. सुदैवाने यात जीवितहानी टळली. दुसरीकडे एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले. शनिवारी सकाळी ११.४५ वाजता परधाडे ता. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ हा थरार प्रवाशी आणि कामगारांनी अनुभवला. काही सेकंदाच्या या घटनमुळे या सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता.

 कामाख्याहून मुंबईला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. १२५२० अप) ही जळगाव स्थानकावरुन शनिवारी सकाळी रवाना झाली. पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक तिसर्‍या रेल्वे मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने सिमेंटचे ब्लॉक ठेवण्याचे काम सुरू होते.  याचवेळी  भरधाव वेगातील एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या भागावर जेसीबीचा पुढील भाग धडकला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भरधाव एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.

लोकोपायटलने गाडीवर नियंत्रण मिळवत ती काही अंतरावर थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र मोठा अनर्थ टळला. तासाभराच्या प्रयत्नानंतर  जेसीबी बाजूला करण्यात आले.  यानंतर दुपारी  कामाख्या एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्र.१  वर थांबविण्यात आली. भुसावळ येथून दुसरे इंजिन मागवून ते कामाख्या एक्सप्रेसला जोडण्यात आले नंतर ही गाडी दुपारी १२.५०  मुंबईच्या दिशेने रवाना झाली. लोको पायलटच्या सर्तकतेने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  यामुळे  रेल्वे गाडीतील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसJalgaonजळगाव