शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पाण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 4:23 PM

हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देसंतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चाअचानक आलेल्या मोर्चाने प्रशासनाची उडाली धांदलमोर्चामुळे ग्रामपंचायतीची सभा रद्दगावाला होतो ४० ते ४५ दिवसांनी पाणीपुरवठाजलसंकट असतानाही माथेफिरूने गावातील मुख्य जलवाहिनी फोडलीपुन्हा पाणीपुरवठ्यात होतोय खंडग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची संतप्त महिलांची मागणी

रणजित भालेरावहिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. या ग्राम पंचायतीवर प्रशासक बसवावा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.सध्या मे महिना सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस भरपूर वाढ आहे. परिणामी परिसरातील विहिरींच्या जलपातळीत झपाट्याने घट होत आहे. याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केळी बाग फेकून दिली आहे तर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे तब्बल ४० ते ४५ दिवसांनी मिळत आहे. याचाच उद्रेक म्हणून १० मे रोजी सकाळी १० वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा आणला आणि आपला संताप व्यक्त केला.विशेष म्हणजे १० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी विशेष मासिक सभा बोलविलेली होती. ही सभा सुरू होण्याअगोदरच गावातील महिलांचा मोर्चा धडकल्याने ग्रामविकास अधिकारी व कार्यकारी मंडळाची एकच धांदल उडाली. त्यामुळे ही सभा होऊ शकली नाही. गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोर मध्यम प्रकल्पाचा गावाला काडीमात्र फायदा नाही. तसेच गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत अंदाजित ४७ लाख रुपये एवढा निधी जलवाहिनीसाठी व जलकुंभासाठी त्यात ट्यूबबवेल व विहीर यांचा समावेश नसल्याने या योजनेचा गावासाठी काय फायदा? म्हणजे शासनाचे ४७ लाख हे वाया जातील, असे बोलून दाखविले.गावात एवढे जलसंकट असतानासुद्धा कोणीतरी माथेफिरू अज्ञात इसमाने गावातील मुख्य जलवाहिनी फोडून टाकली आहे. त्यामुळे ४० ते ४५ दिवसांनी होणाºया पाणीपुरवठ्यात खंड पडला आहे. म्हणजेच जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार गावात सध्या घडत आहे, अशी संतप्त भावना या वेळी बोलून दाखविण्यात आली.प्रतिक्रियागावातील पाणीटंचाई बघता तात्पुरत्या स्वरूपात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या विहिरीचे पाणी जोडले आहे.-आर.ई. चौधरी, ग्रामविकास अधिकारीगावातील भीषण पाणीटंचाई बघता गावाच्या आजूबाजूच्या विहिरींची पाहणी करून यावल तहसीलदारांंना ६ मे रोजी झालेल्या बैठकीत ८ विहिरी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.-डी.एच.गवई, तलाठी, हिंगोणादिवसेंदिवस जलपातळीत घट होत आहे. जलपातळी ४०० ते ५०० फूट खोल गेली असल्याने गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी काही शेतकºयांकडून पाणी घेतले आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जलस्वराज्य विहिरीत कॉम्प्रेसर टाकून पाणी प्रश्र लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.-सत्यभामा शालिक भालेराव, सरपंच, हिंगोणा, ता.यावल

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल