PUBG च्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन; जामनेर शहरातील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 09:43 PM2021-10-10T21:43:09+5:302021-10-10T21:43:17+5:30

नम्रता (मुळ रा.भराडी,ता.जामनेर) ही आई, वडील व लहान भावासोबत नगारखाना भागात राहत होती.

The life of a young woman who went on a diet of PUBG ended; Accident in the city of Jamner | PUBG च्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन; जामनेर शहरातील दुर्घटना

PUBG च्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन; जामनेर शहरातील दुर्घटना

Next

जामनेर (जि. जळगाव) :  येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गळफास घेत आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना  घडली. तिला मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याचा नाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.  या मागे त्या संबंधीचे कारण तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

नम्रता (मुळ रा.भराडी,ता.जामनेर) ही आई, वडील व लहान भावासोबत नगारखाना भागात राहत होती. तिचे वडील याच भागातील एका डॉक्टरकडे सहाय्यक  म्हणून काम करीत होते.  त्यांच्या नवीन घराचे बांधकाम वाकी रस्त्यावर सुरु असल्याने तिची आई त्या ठिकाणी गेली होती. लहान  भाऊ देखील आई सोबत असल्याने घरात कुणीही  नसल्याचे पाहून तिने घराच्या स्लॅबला दोर बांधून गळफास घेतला. आई घरी परतल्यावर घटना उघडकीस आली. मुलीचा मृतदेह पाहताच  तिने हंबरडा फोडला. खोलीतच असलेली तिने लिहिलेली  चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तरुण मुलीच्या अकस्मात मृत्यूने या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  या घटनेने नगारखाना  परीसरात व तिच्या मुळ गावी भराडी येथे शोककळा पसरली आहे. भराडी येथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोबाईल फेसलॉक आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नये असे तिने सुसाईडनोट मध्ये इंग्रजीत लिहिले आहे.  जप्त केलेला मोबाईल फेस लॉक असल्याने पोलिसांनी तिच्या चेहऱ्यासमोर नेत तो उघडला. मोबाईलमध्ये पब्जी गेम संबंधीत स्क्रिनशॉट मिळाल्याचे सुत्रांकडून समजले.

Web Title: The life of a young woman who went on a diet of PUBG ended; Accident in the city of Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app