शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा ...

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करत जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. हात सॅनिटाईज करून व तापमान मोजूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली.

जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १९२६ शाळा असून त्यामध्ये सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या. शहरातील नंदिनीबाई विद्यालय, प्रगती विद्यालय यासह इतर शाळांमध्ये सकाळी ७.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्याआधी प्रवेशद्वारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज केले. नंतर तापमान व ऑक्सिजन मोजून वर्गात प्रवेश दिला. सामाजिक अंतर राहावे, यासाठी खुणासुध्दा शालेय परिसरात आखण्यात आल्या होत्या.

कुठे तुरळक तर कुठे चांगली उपस्थिती

लोकमत प्रतिनिधीने शहरातील काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती़ मात्र, ए.टी.झांबरे, नंदिनीबाई तसेच कन्या, चौबे मनपा व इतर शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक केले होते. तर वर्गातही सामाजिक अंतर ठेवून बसविण्यात येत होते. गणित, इंग्रजी, विज्ञान यासह इतर काही विषयांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत शाळा सुरू होती.

गप्पा रंगल्या..

दीर्घ कालावधीनंतर वर्गातील मित्र-मैत्रिणी भेटल्यानंतर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीसुध्दा हजेरी लावली होती. त्यावेळी संमतीपत्रसुध्दा भरून घेतले जात होते. ए.टी. झांबरे विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा शाळांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खूप दिवसांनी मित्र-मैत्रिणी तसेच शिक्षक भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शिक्षण विभागाच्या पथकाकडून पाहणी

प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गाची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थी उपस्थिती तपासून आवश्यक सूचना त्यांनी केल्या.