जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 14:48 IST2020-12-14T14:12:42+5:302020-12-14T14:48:53+5:30
Jalgaon News : गेल्या काही दिवसापासून दहशत पसरविणार्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बिबट्या जेरबंद
जळगाव - गेल्या काही दिवसापासून दहशत पसरविणार्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२ते १वाजेच्या दरम्यान भार्डू ता.चोपडा परिसरात घडली.
बिबट्याने काहीतरी खाल्ल्याने अथवा आजारी असल्याने एकाच जागेवर बसल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. भार्डू आणि (लहान) हातेड येथील नागरिकांनी बिबट्यास घेरून ठेवले. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बिबट्यास जेरबंद केले.
बिबट्यास पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी व्ही. एच. पवार,चोपडा वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे, सत्रासेन आणि लासुर येथील वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.