विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी प्रा़ शिरीष कुळकर्णी यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:33 IST2020-08-10T21:32:51+5:302020-08-10T21:33:00+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या द्वितीय नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे ...

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी प्रा़ शिरीष कुळकर्णी यांचे व्याख्यान
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या द्वितीय नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.शिरीष कुलकर्णी यांचे आॅनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
११ आॅगस्ट २०१८ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा करण्यात आला. या व्दितीय नामविस्तार दिनानिमित्त उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर कुलगुरु प्रा.शिरीष कुलकर्णी हे उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता आॅनलाईन बोलणार असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांची उपस्थिती यावेळी असेल. झूम अॅपव्दारे हे व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी दिली.