शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

लाडू गँगच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 19:52 IST

राकेश सपकाळे खून प्रकरण : मध्यरात्री एलसीबीने घातली झडप

जळगाव : माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खून प्रकरणात फरार असलेला लाडू गँगचा प्रमुख आकाश मुरलीधर सपकाळे (२३,रा.कांचन नगर) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री पाळधी, ता.धरणगाव येथून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यापासून आकाश सपकाळे हा पोलिसांना चकवा देत होता. रोज गँगच्या इतर सहकाऱ्यांकडून माहिती घेऊन तो राहण्याचे ठिकाण बदल करीत होता. शनिवारी सकाळी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.राकेश याचा ४ नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यात गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर या चार जणांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, अधिकच्या चौकशीत आकाश हा देखील गुन्ह्यात निष्पन्न झाला होता. पोलिसांनी त्याला पाचव्या क्रमांकाचा आरोपी केला आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्याचे वर्तुळ पूर्ण झाले असले तरी धग मात्र कायम आहे.आकाश याची गुन्हगारी दहशत तसेच त्याच्या गँगने शहरात माजविला धुमाकूळ पाहता तो पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत हवा होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आदी अधिकारी रोज या गुन्ह्याचा आढावा घेऊन तपासासाठी पोलिसांचे पथके रवाना केली जात होती. अशातच आकाश हा पाळधी येथे रात्री येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजयसिंग पाटील यांना मिळाली. बकाले यांनी विजयसिंग यांच्या दिमतीला जितेंद्र पाटील, राहूल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर व शहरचे रतन गिते आदींचे पथक दिले. या पथकाने ज्या ठिकाणी आकाश येणार त्याच परिसरात आधीच सापळा लावला व त्यात तो अलगद जाळ्यात अडकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव