एलसीबी व स्थानिक पोलिसांच्या छाप्यात २ बुकींसह ५ जुगारीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 22:37 IST2021-04-10T22:37:10+5:302021-04-10T22:37:56+5:30
सट्टा जुगार चालवणाऱ्या दोन बुकिंसह ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

एलसीबी व स्थानिक पोलिसांच्या छाप्यात २ बुकींसह ५ जुगारीवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : एलसीबी व स्थानिक पोलिसांनी छापा टाकून सट्टा जुगार चालवणाऱ्या दोन बुकिंसह ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून १० रोजी दुपारी २ वाजता एलसीबी चे हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, सुनील दामोदरे, प्रमोद वंजारी, भारत पाटील, स्थानिक पोलीस दीपक माळी, डॉ. शरद पाटील व रवींद्र पाटील यांनी बाहेरपुरा भागात भारत पान सेंटरच्या बाजूला कमीलखा लहूखा पठाण हा जुगार चालवताना आढळून आला. त्यांच्याजवळून ४ हजार ५५० रुपये व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
त्याचा मालक त्याने रहीम छोटू बागवान असल्याचे सांगितले तर तेथेच जवळ गुलाब नथु पाटील हादेखील सट्टा जुगार खेळताना आढळून आला. त्यांच्याजवळून ४ हजार ४४० रुपये व सट्टा जुगाराचे साधने जप्त करण्यात आले आहे. त्याने त्याचा मालक प्रल्हाद संतोष पाटील उर्फ न्हानभाऊ (पैलाड) असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे स्थानिक पोलिसांनी तांबेपुरा भागात चिंत्या चौकात छापा टाकून किशोर गुलाबराव पाटील याला सट्टा जुगार खेळताना अटक केली. त्याच्या जवळून १ हजार १६० रुपये आणि सट्टा जुगाराचे साधने जप्त केले आहेत. पाचही जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा व भादंवि कलम १०९प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.