दहीवद येथे आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:29+5:302021-09-02T04:36:29+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य विनोद जाधव, प्रवीण पाटील, लोक संघर्ष ...

दहीवद येथे आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य विनोद जाधव, प्रवीण पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, कृ. उ. बा. समितीचे प्रशासक एल. टी. पाटील, संदीप घोरपडे सर, नगरसेविका राधाबाई पवार, भाईदास भिल, नगावचे सरपंच महेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे संजय पवार ,विजय पुनमचंद पारधी, समाधान पारधी, बालीक पवार, ढेकुचे रावसाहेब पवार, अमळगावचे मिलिंद पाटील, बन्सिलाल पारधी, दापोरीचे हिरालाल महाराज, एकलव्य सेनेचे राज साळवी, टाकरखेडाचे ज्ञानेश्वर पाटील, दहीवदच्या माजी सरपंच नंदाबाई मावळे, ग्रा. पं. सदस्य हिराबाई भिल, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सीमा पारधी, मुकेश पारधी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत सोनवणे, अजय पारधी, शिवाजी पारधी, सुनील चव्हाणसह शेकडो आदिवासी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. अपेक्षा टेंटचे मालक अनिल माळी यांनी विनामूल्य सेवा दिली.
प्रास्ताविक बारेला सर यांनी केले. सूत्रसंचालन व्ही. आर. पाटील सर यांनी केले. लाभार्थींना किट वाटपाचे नियोजन शिरसाठ सर, वैशाली पाटील, चारूशिला महाजन यांनी केले. आभार गणेश तांदळे सरांनी मानले.