शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

अवकाळी पावसाचे गेल्या वर्षाचे नुकसान अनुदान त्वरित द्यावे --भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 4:14 PM

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून पात्र शेतकरी लाभार्थीस मंजूर अनुदान वितरीत न करता, ते अनुदान शासनास परत करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करावी

यावल : गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून पात्र शेतकरी लाभार्थीस मंजूर अनुदान वितरीत न करता, ते अनुदान शासनास परत करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना भाजपतर्फे देण्यात आले.खरीप २०१९च्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला होता. त्यावेळी तत्कालीन भाजप सरकारने शेतकºयांना नुकसानीपोटी हेक्टरी आठ हजार रुपयेप्रमाणे अनुदान मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला होता. निधी वाटपात शासकीय यंत्रणेने नाव एका व्यक्तीचे तर खाते नंबर दुसºयाचा, तर काहींना अनुदान वाटपच केले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आजपर्यंत साधारण २१०० शेतकºयांना निधी मिळालेला नाही. हा निधी मुदतीच्या आत शासनास परत पाठवण्यात आल्याची कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील २१०० शेतकºयांना विनाकारण तहसील कार्यालयामध्ये फेºया माराव्या लागत आहेत व मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा निधी परत पाठवण्याची घाई का करण्यात आली. तसेच अनुदान वाटपात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झालेला दिसून येतो. हा हलगर्जीपणा केलेल्या कर्मचाºयांची चौकशी करून संबंधित कर्मचारी, तहसीलदार यांची चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. अन्यथा तालुका भारतीय जनता पक्षातर्फे पंधरवड्यानंतर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जि.प.चे माजी सदस्य भरत महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे. यावल शहराध्यक्ष नीलेश गडे. संजय सराफ, अनंत नेहते, मच्छिंद्र चौधरी, किशोर पाटील, परेश नाईक आदींच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनYawalयावल