फैजपूर येथे बंद घराचा दरवाजा तोडून १९ हजार रुपये लंपास, लाखाचे दागिने सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:56 IST2018-02-13T12:55:29+5:302018-02-13T12:56:01+5:30

पोलिसांनी केली पाहणी

Lapsing 19,000 rupees in Faizpur | फैजपूर येथे बंद घराचा दरवाजा तोडून १९ हजार रुपये लंपास, लाखाचे दागिने सुरक्षित

फैजपूर येथे बंद घराचा दरवाजा तोडून १९ हजार रुपये लंपास, लाखाचे दागिने सुरक्षित

वासुदेव सरोदे / आॅनलाईन लोकमत

फैजपूर, जि. जळगाव, दि. १३ - यावल तालुक्यातील फैजपूर येथे गुरुदत्त कॉलनीमध्ये बिपीन यशवंत ढाके यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी १९ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. सुदैवाने घरातील लाखाचे दागिने सुरक्षित आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
बिपीन ढाके हे सावदा येथे गेलेले होते. त्या वेळी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दर्शनी भागाचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात लोखंडी कपाटाचीही दरवाजा तोडून सााहित्य अस्ताव्यस्त फेकले.
मंगळवारी सकाळी ढाके कुटुंबीय घरी परतले त्या वेळी ही घटना लक्षात आली. घरात त्यांनी पाहिले असता १९ हजार रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. मात्र सुदैवाने घरातील लाखाचे दागिने सुरक्षित असल्याचे लक्षात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक फौजदार हेमंत सांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. त्यानंतर श्वानाने भुसावळ रस्त्यापर्यंत माग काढला.

Web Title: Lapsing 19,000 rupees in Faizpur