भूमापकास मारहाण करणाऱ्याचा अटकपूर्व फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:49 IST2019-09-16T23:49:15+5:302019-09-16T23:49:52+5:30
जळगाव - काही कारण नसताना भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक प्रफुल्ल माणिकराव पाटील यांना राजा भगवान सोनवणे याने २८ आॅगस्ट रोजी ...

भूमापकास मारहाण करणाऱ्याचा अटकपूर्व फेटाळला
जळगाव- काही कारण नसताना भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक प्रफुल्ल माणिकराव पाटील यांना राजा भगवान सोनवणे याने २८ आॅगस्ट रोजी मारहाण केली होती़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ दरम्यान, संशयित राजा सोनवणे याने न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता़ त्यावर सोमवारी कामकाज होवून न्यायालयाने संशयिताचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे़ याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड़ केतन ढाके यांनी कामकाज पाहिले़