राज्यभरातील जमिनींची सॅटेलाईटमार्फत मोजणी - महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:34 PM2018-11-24T12:34:40+5:302018-11-24T12:35:01+5:30

जुन्या दस्तावेजांची जतन करून त्यांचे डिजीटायझेशन

Land Acquisition by Satellite - Revenue Minister Sanjay Rathod | राज्यभरातील जमिनींची सॅटेलाईटमार्फत मोजणी - महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची माहिती

राज्यभरातील जमिनींची सॅटेलाईटमार्फत मोजणी - महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची माहिती

Next

जळगाव : राज्यभरातील जमिनीची मोजणी इंग्रजांच्या काळापासून झालेलीच नाही, त्यामुळे जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून सॅटेलाईटमार्फत मोजणी सुरू करण्यात आली आहे. तसेच जुन्या दस्तावेजांची जतन करून त्यांचे डिजीटायझेशन करण्यात येत आहे. एनएमध्येही सुधारणा करण्यात येत आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जळगावात दिली.
गौरबंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या पोहरागढ जि.वाशिम येथे समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वास्तूसंग्रहालयाच्या (नंगारा भवन) कामाचे भूमिपूजन ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात जिल्हास्तरावर बैठका घेण्यात येत असून त्यासंदर्भात राठोड हे शुक्रवारी जळगावात आले होते. कार्यकर्त्यांची या संदर्भात बैठक घेण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियमांतर्गत जिल्ह्यातून दाखल होणाºया बºयाच केसेसची मंत्रालयात सुनावणी प्रलंबितआहे. त्याच्या सुनावणीसाठी संबंधीत नागरिकांना मुंबईला येणे त्रासदायक व खर्चिक होत असल्याने या केसेसची सुनावणी जळगावात येऊन करणार असून महिनाभरात याची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहितीही संजय राठोड यांनी दिली.

Web Title: Land Acquisition by Satellite - Revenue Minister Sanjay Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव