लक्ष्मी आली घरा, तोचि आनंदाची दिवाळी दसरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:30+5:302021-07-11T04:12:30+5:30

भडगाव : तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील राहुल अरुण देसले हे लखनाै येथे आर्मीत कार्यरत आहेत. त्यांना पहिली कन्या झाल्याने ...

Lakshmi came home, that is the happy Diwali Dussehra .. | लक्ष्मी आली घरा, तोचि आनंदाची दिवाळी दसरा..

लक्ष्मी आली घरा, तोचि आनंदाची दिवाळी दसरा..

भडगाव : तालुक्यातील

पिंपळगाव बुद्रुक येथील

राहुल अरुण देसले हे लखनाै येथे आर्मीत कार्यरत आहेत. त्यांना पहिली कन्या झाल्याने फुलांच्या पाकळ्या टाकून कन्येचे उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.

पेढे वाटून आनंद साजरा करत मुलीचे स्वागत केले. ‘लक्ष्मी आली घरा, तोचि आनंदाचा दिवाळी दसरा..’ असे आनंदमय चित्र दिसून आले. दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर मातेसह कन्येला घरी आणले. शुक्रवारी मुलगी जन्माला आल्याने तिचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. घरात पूर्णपणे सजावट करून फुलांच्या पाकळ्या खाली टाकून राहुल देसले व शुभांगी देसले यांनी आपल्या पहिल्या कन्येला घरी आणून आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले.

नातेवाईक, परिवार, नागरिकांना पेढे वाटून गोडवा निर्माण झाल्याचे दिसून आले. राहुल देसले हे २०१३मध्ये जळगाव येथे आर्मीत भरती झाले होते. राजस्थान, पंजाब व आता लखनाै येथे ते देशाची सेवा बजावत कार्यरत आहेत. घराची परिस्थिती साधारण असल्याने आई-वडील, मोठा भाऊ, शेतीकाम करतात व त्यांना बहीण नसल्याने मुलगी झाली तर इतका आनंद त्यांनी गावात पेढे वाटले.

राहुल देसले यांचे दोन वर्षांपूर्वी डोंगराळे, ता. जि. धुळे येथील शुभांगी यांच्याशी लग्न झाले होते. शुभांगीबाईंना मिलिटरी हॉस्पिटल लखनाै येथे ॲडमिट करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुलगी जन्माला आली. त्यांनी एवढ्या मोठ्या स्वागताचे आनंदात नियोजन केले. शुक्रवार म्हणजे आज देवीचा वार असल्याने साक्षात लक्ष्मी आली. आमच्या घरी त्यांनी लक्ष्मी नाव ठेवले आहे. या आनंदमय सोहळ्याने परिवारात समाधानाचे वातावरण दिसून आले.

Web Title: Lakshmi came home, that is the happy Diwali Dussehra ..