भडगाव तालुक्यातील वाडे येथे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:52 IST2019-09-08T12:52:10+5:302019-09-08T12:52:44+5:30
नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी

भडगाव तालुक्यातील वाडे येथे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
भडगाव, जि. जळगाव : तालुक्यातील वाङे येथे आनंद रमेश मोरे यांचे मातीचे राहते घर अचानक कोसळून परिवारातील सदस्यांना दुखापत झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. शेजारच्या नागरिकांनी मदत केली. यात संसारोपयोगी वस्तूंसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घङली.
महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त परिवारासह नागरिकातून होत आहे.