The lack of masks, sanitizer villages | मास्क, सँनेटायझरचा गावांमध्ये अभाव

मास्क, सँनेटायझरचा गावांमध्ये अभाव

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनामुळे पुण्या-मुंबईसह इतर शहरातून हजारो नागरिक गावागावात परतले असताना त्यांची तपासणी करताना ग्रामसेवक, सरपंच पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व स्थानिक कमिटी सदस्य यांच्या सुरक्षेची कोणतीही साधने नाही.
रोज उठून बाहेरून आलेल्या रुग्णांची चौकशी करणे, तपासणी करणे, त्यांना संदर्भ सेवा देणे ही कामे सुरू असताना अजूनही ग्रामीण भागात गाव पातळीवर सँनेटायझर, मास्क, ग्लोज या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेच दिसत नाही. प्रशासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे .
येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे सुद्धा आरोग्य सेविका परिचारिका असून त्यांनाही केवळ दोनच मास्क पुरवण्यात आले. आशा सेवक यांनाही मास्क मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.मात्र होम क्वारंटाईन करताना ग्रामस्थ ऐकत नाही. ती शाई ही धुतली जाणारी आहे.
बाहेरून आलेल्यांना भेटत असताना त्याचे नियंत्रण सरपंच, पोलिस पाटील यांनी करावे अशी अपेक्षा आहे.मात्र अशा नागरिकांचे सर्वेक्षण करीत असताना आमच्या सुरक्षेचे काय ?असा प्रश्न अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील उपस्थित करीत आहेत. मात्र त्याचे उत्तर देखील शासनाकडून मिळाले नसल्याने सांगण्यात आले.
प्रशासकीय सूचना काही नागरिकांनी ऐकल्या नाही तर गावात नेमलेल्या समितीने गुन्हे दाखल करावेत अशीही आदेश देण्यात आले आहेत मात्र गाव पातळीवर जर कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याबाबत पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असेल तर त्यांनासुद्धा मास पुरवून गैरसोय दूर करण्याची गरज आहे.
असेच राहिले तर स्थानिक पातळीवर पोलीस पाटील यांची भूमिका मग काय राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: The lack of masks, sanitizer villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.