संपर्क फाऊंडेशनकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:53+5:302021-09-19T04:16:53+5:30

पालक गमावलेल्या पाल्यांना मदत : रुग्ण साहित्याचे लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारत विकास परिषद संचलित संपर्क फाऊंडेशनतर्फे ...

Kovid Warriors honored by Sampark Foundation | संपर्क फाऊंडेशनकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

संपर्क फाऊंडेशनकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

पालक गमावलेल्या पाल्यांना मदत : रुग्ण साहित्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारत विकास परिषद संचलित संपर्क फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी रुग्णसाहित्य लोकार्पण आणि कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा पार पडला. महेश प्रगती सभागृहात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या देशभरातील पाल्यांना शिक्षणासाठी मासिक एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय वित्त सचिव संपत खुर्दीया यांनी केली. भारत विकास परिषदेने ३५ लाखाचा निधी राखून ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय वित्त सचिव संपत खुरदीया, राष्ट्रीय सचिव सुधीर पाठक, प्रांत अध्यक्ष गोपाल होलाणी, जिल्हा रा.स्व.संघचालक डॉ.नीलेश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक तथा के. के. कँन्सचे अध्यक्ष उद्योजक रजनिकांत कोठारी, भारत विकास परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष उज्वल चौधरी, संपर्क फाऊंडेशचे सेटलर तुषार तोतला, डॉ.सुरेश अग्रवाल आदी उपस्थित होते. कोविड योध्दा सन्मान सोहळा कार्य कौतुकास्पद असल्याचे खासदार उन्मेश पाटील म्हणाले.

यांचा झाला सन्मान

डॉ.राहूल महाजन, डॉ.पराग चौधरी, डॉ.धनराज चौधरी, डॉ. परिक्षित बावीस्कर, डॉ.कल्पेश गांधी, डॉ.गुणवंत महाजन, डॉ.मंदार पंडित, डॉ.लीना पाटील, डॉ.तेजस राणे, डॉ.पल्लवी राणे, डॉ.विलास भोळे, डॉ.कमलेश मराठे, डॉ.प्रशांत अग्रवाल यांच्यासह २४ डॉक्टरांना गौरविण्यात आले. याचबरोबर भोजन व्यवस्था करणारे अतुल तोतला, अतुल राका या परिवाराचा तसेच अंतिम संस्कार करणार्या विकास वाघ, मुकेश पाटील या योध्यासोबत संपर्क फाऊंडेशनच्या कर्मचारी वर्गाला मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संपर्क फाऊंडेशनच्या सेवाव्रती वर्षा अहिरे, रेखा भारुडे, परवीन खान, वंदना वानखेडे, सरला सोलंके, आशा खाटीक, लक्ष्मी सैंदाणे, अमित गवळी, योगेश सोलंकी, अक्षय चौधरी, मनोज चौधरी यांच्याही कोविड काळातील कार्याचा गौरव करण्यात आला. माजी प्रांत अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, उद्योजक श्रीराम पाटील, केदारनाथ मुंदडा, डॉ.रत्नाकर गोरे, डॉ.सुरेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी केले. आभार डॉ. सुरेश अग्रवाल यांनी मानले.

Web Title: Kovid Warriors honored by Sampark Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.