आसोदा येथे तरुणावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:00 IST2020-03-23T21:00:29+5:302020-03-23T21:00:43+5:30

जळगाव : तालुक्यातील असोदा येथे राहूल कैलास पाटील (२४) या तरुणावर किरकोळ कारणावरुन एकाने चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी ...

 Knife attack on youth at Asoda | आसोदा येथे तरुणावर चाकू हल्ला

आसोदा येथे तरुणावर चाकू हल्ला

जळगाव : तालुक्यातील असोदा येथे राहूल कैलास पाटील (२४) या तरुणावर किरकोळ कारणावरुन एकाने चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल पाटील हा असोदा येथील हॉटेलवर कारागीर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल बंद असल्यामुळे राहुल घरीच होता. सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गल्लीत राहणारा संतोष येळकोट माळी हा दारु पिऊन शिवीगाळ करायला लागला. राहूल याने त्याला जाब विचारला असता संतोष माळी याने कांदा कापण्याच्या चाकूने राहूलच्या दोन्ही हातावर वार केले.डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title:  Knife attack on youth at Asoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.