किनगाव आरोग्य केंद्राने केले चार गावांमध्ये लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:57+5:302021-09-11T04:18:57+5:30

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उंटावद, गिरडगाव, डोणगाव आणि वाघोदा अशा एकूण ४ गावांना पहिला डोस लसीकरणाचा १०० ...

Kingaon Health Center completes vaccination in four villages | किनगाव आरोग्य केंद्राने केले चार गावांमध्ये लसीकरण पूर्ण

किनगाव आरोग्य केंद्राने केले चार गावांमध्ये लसीकरण पूर्ण

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उंटावद, गिरडगाव, डोणगाव आणि वाघोदा अशा एकूण ४ गावांना पहिला डोस लसीकरणाचा १०० टक्के कार्यक्रम यशस्वी झाला.

किनगाव केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांना प्रमाणात लसीकरण लवकरच पूर्ण केले जाईल, असे डॉ. मनीषा महाजन यांनी सांगितले. जि.प. सदस्या अरुणा रामदास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मोठ्या प्रमाणात लस मिळाल्यामुळे या ४ गावांना पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करता आले, असेही सांगण्यात आले. या मोहिमेत आरोग्य केंद्राचे समुदाय अधिकारी डॉ. अमोल पाटील, डॉ. अशपाक, डॉ. वकार, डॉ. मोहसीन, डॉ. धनंजय, आरोग्य सहायक उषा पाटील, आरोग्य सेविका कुमुदिनी इंगळे, भावना वारके, कविता सपकाळे, शीला जमरा, कल्पना सूर्यवंशी, मंगला सोनवणे, नावादी बरेला, आरोग्य सेवक विठ्ठल भिसे, दीपक तायडे, जीवन सोनवणे, मनोज बारेला तसेच भूपेंद्र महाजन, शिपाई सरदार कानाशा, वाहन चालक कुर्बान तडवी आणि सर्व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

याबद्दल डॉ. मनीषा महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. भीमशकर जमादार आणि तालुका आरोग्य आधिकरी डॉ. हेमंत बऱ्हाटे व जि.प. सदस्या अरुणा रामदास पाटील यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Kingaon Health Center completes vaccination in four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.