जळगावातील ओरिआॅन स्कूलची किमया चौधरी चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:46 IST2018-05-29T22:46:41+5:302018-05-29T22:46:41+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला.

जळगावातील ओरिआॅन स्कूलची किमया चौधरी चमकली
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये केसीई सोसायटी संचलित ओरिआॅन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची किमया हर्षल चौधरी ही ९८.४० टक्के गुण मिळवून तर आशीष सुनील पाटील या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण मिळवित यश मिळविले. शहर व परिसरातील आठही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकालाची सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याचे समजल्यानंतर सकाळपासूनच सर्व जणांना संकेतस्थळावर निकाल लागण्याची प्रतीक्षा लागलेली असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास निकाल जाहीर झाला.