हिंगोणेजवळ अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:22 IST2018-10-25T16:21:06+5:302018-10-25T16:22:38+5:30

चाळीसगाव एमआयडीसीत मोटारसायकलने कामासाठी येणाऱ्या तरुणाला मालवाहू गाडीने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला.

killed young people in an accident | हिंगोणेजवळ अपघातात तरुण ठार

हिंगोणेजवळ अपघातात तरुण ठार

ठळक मुद्देएमआयडीसीत कामासाठी येत असताना अपघातमालवाहू गाडीने दिली दुचाकीला धडकहिंगोणे ते वाघळी दरम्यान झाला अपघात

चाळीसगाव : चाळीसगाव एमआयडीसीत मोटारसायकलने कामासाठी येणाऱ्या तरुणाला मालवाहू गाडीने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सात वाजता हिंगोणे - ते वाघळी दरम्यान घडला.
हिंगोणे खुर्द येथील उमेश विजय चव्हाण (वय २२) हा चाळीसगाव येथील एमआयडीसीत कामावर येण्यासाठी आपली मोटारसायकलने (क्र. एमएच१९ बीएक्स ४३६१) निघाला होता. त्याचवेळी चाळीसगावहून कजगावकडे जाणा-या मालवाहू गाडीने (क्र. एमएच १९ झेड २६३८) जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ज्ञानेश्वर मोहन चव्हाण यांच्या फियार्दीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजे करीत आहे.

Web Title: killed young people in an accident