खेडगाव येथे ट्रॅक्टरला जोडलेल्या थ्रेशरमशीनमध्ये साडी अडकून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:43 IST2018-05-04T13:43:33+5:302018-05-04T13:43:55+5:30
भडगाव तालुक्यातील घटना

खेडगाव येथे ट्रॅक्टरला जोडलेल्या थ्रेशरमशीनमध्ये साडी अडकून महिला ठार
आॅनलाइन लोकमत
खेडगाव, जि. जळगाव, दि. ४ - भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे थ्रेशरमशीनमध्ये साडी अडकून मशीनमध्ये सापडल्याने सोनी श्रावण मोरे (वय २५) ही महिला ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या महिलेला अवघ्या सहा महिन्याचा एक मुलगा व दोन मुली असून ती मजुरीकाम करीत होती.
सकाळी नेहमीप्रमाणे शांताराम दयाराम पाटील यांच्या ट्रँक्टर-थ्रेशरमशीनवर इतर सात मजुरांबरोबर ती भिका जयराम पाटील यांचे शेतात बाजरी काढण्यासाठी गेली होती. धान्य काढूुन झाले असताना शेवटी उर्वरित भाग जजमा करीत असताना ट्रक्टर व थ्रेशर जोडलेल्या पीडीओ साफ्टर (गोल फिरणारा लोखंडी भाग) मध्ये तिचा साडीचा भाग सापडुन ती गुडांळली गेली. यात गंभीर मार लागून ती जागेवरच मृत झाली. पी.एस.आय. जाधव व कोळगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवचिकित्सेसाठी भडगाव येथे पाठविण्यात आले. सोनी मोरे ही खेडगावी वडील चैत्राम सोनवणे यांच्याकडेच वास्तव्यास होती. घटनेने इंदिरानगर वसाहतीतील सर्व मजूर घरी परतले.